“83’मध्ये कपिल देव यांच्या कन्येचेही योगदान

भारतीय क्रिकेट टीमने जिंकलेल्या पहिल्या वर्ल्ड कपवर आधारीत “83′ या सिनेमात आता आणखी एका नवीन चेहऱ्याचे योगदान असणार आहे. भारतीय क्रिकेट टीमचे तत्कालिन कर्णधार कपिल देव यांची कन्या अमिया ही या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून काम करणार आहे.

असिस्टंट डायरेक्‍टर म्हणून तिचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान ती डायरेक्‍टर कबीर खान यांना सहकार्य करणार आहे. ती डायरेक्‍शनच्या टीममध्ये आल्यापासून दररोजच ट्रेनिंग सेशनला उपस्थित रहायला लागली होती. प्रत्येक कलाकाराच्या शेड्युलचीही तिला पक्की माहिती आहे, असे संदीप पाटील यांचे पुत्र चिरागने सांगितले.

चिराग आणि तामिळ कलाकार जीवा हे या टीममधील खेळाडूंच्या रोलमध्ये दिसणार आहेत. तर रणवीर सिंह स्वतः कपिल देव यांच्या रोलमध्ये दिसणार आहे. या सिनेमातल्या भारतीय टीमच्या खेळाडू कलाकारांना स्वतः कपिल देव प्रशिक्षण देत आहेत. या सर्व टीमचे ट्रेनिंग सेशन धर्मशालामध्ये होणार आहे. त्यानंतर स्कॉटलंड आणि लंडनमध्ये क्रिकेट सामन्यांचे शुटिंग होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)