827 पॉर्न वेबसाईटवर बंदीचे केंद्र सरकारने दिले आदेश 

नवी दिल्ली: केंद्र सरकारने अश्‍लिल सामग्री (पॉर्न) दाखवणाऱ्या 827 वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर इंटरनेट सेवा देणाऱ्यांना सरकारने हे आदेश दिले आहेत. न्यायालयाने नुकतेच अश्‍लीलता पसरविणाऱ्या 857 वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र, इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि माहिती सूचना मंत्रालयाने 857 पैकी 827 वेबसाईट बंद करण्याचे सांगितले आहे.

मंत्रालयाने केलेल्या चौकशीत 857 मधील 30 वेबसाईटवर अश्‍लील सामग्री मिळून आली नसल्याने या साईट्‌स सुरूच ठेवल्या जाणार आहेत. या बंद केलेल्या सर्व वेबसाईटची यादी मंत्रालयाने एका पत्राद्वारे जाहीर केली आहे. सर्व लायसेन्स प्राप्त लाइसेंस प्राप्त इंटरनेट सेवा पुरवठादारांना हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करणे गरजेचे आहे. मंत्रालयाच्या आदेशानुसार 827 वेबसाईट बंद करण्याची कार्यवाही तत्काल करावी, असे दूरसंचार विभागाकडून इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

न्यायालयाने 27 सप्टेंबर 2018 रोजी या वेबसाईट बंद करण्याचे आदेश दिले होते. इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि सूचना प्रसारण मंत्रालयाला आठ ऑक्‍टोबर रोजी हे आदेश प्राप्त झाले होते. मंत्रालयाने दूरसंचार विभागाला सूचित केले आहे की, 31 जुलै 2015 च्या जुन्या नोटिशीनुसार उच्च न्यायालयाने 857 वेबसाइट बंद करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारने याआधी चाईल्ड पॉर्नोग्राफीसंबंधित साडे तीन हजारांपेक्षा जास्त वेबसाईट्‌स ब्लॉक केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)