राज्यातील 82 लाख शेतकरी दुष्काळाच्या विळख्यात 

85 लाख हेक्‍टर क्षेत्र बाधीत 

मुंबई: अपूऱ्या पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे तब्बल 82 लाख 27 हजार शेतकरी दुष्काळाच्या विळख्यात अडकले आहेत. तर 85 लाख 76 हजार हेक्‍टर क्षेत्र दुष्काळाने बाधीत झाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

पाणीपुरवठा योजनांसाठी 203 कोटी 
पाणीपुरवठ्याच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी 203 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शिवाय टॅंकरचे अधिकार उपविभागीय अधिक्‌ायांना देण्यात आले असून आवश्‍यकता भासल्यास आपल्या अधिकारात टॅंकर मंजुरीचे अधिकार कनिष्ठ अधिक्‌ायांना बहाल करू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली. शिवाय दुष्काळग्रस्त भागात च्‌ायाच्या उपलब्धतेसाठी 25 जिल्ह्यातील 2 हजार हेक्‍टर क्षेत्र शोधून त्यावर चारा पिकाची लागवड करण्याचे आदेश जिल्हाधिकाछयांना देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

-Ads-

विधानसभेत नियम 293 अंतर्गत सत्ताधारी व विरोधकांनी दुष्काळावर चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी दुष्काळावर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. केंद्राने तयार केलेल्या दुष्काळ संहितेमुळे दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणि अचुकता आली आहे. सध्या जाहीर केलेले दुष्काळी क्षेत्र हे अंतिम नसून दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी मंत्रीमंडळाची एक उपसमिती तयार करण्यात आली आहे. या उपसमितीकडे आलेल्या प्रस्तावांची पाहणी करून नुकसानीचे दावे योग्य असल्यास नियमानुसार तीव्र किंवा मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

सध्या जाहीर झालेल्या दुष्काळी भागात राज्य सरकारने दुष्काळाबाबतचे स्थायी आदेश लागू केले असून त्या व्यतिरिक्तही अधिकच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. या अधिकच्या उपाययोजनांसाठी 3 हजार कोटींची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. जनावरांसाठी चाऱ्याचे नियोजन, मनरेगांतर्गत कामे उपलब्ध करून देण्यासाठी निकष शिथिल करणे, जलाशयातील पाणी पिण्यासाठी प्राधान्याने ठेवणे, शिधापत्रिका नसलेल्यांना त्या उपलब्ध करून देणे, शालेय विद्यार्थ्यांना सुटीदरम्यानही मध्यान्ह भोजन, तसेच विंधन विहिरी आणि टॅंकरच्या प्रस्तावात सुसुत्रता आणणे यासारख्या कामांचा त्यात समावेश असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)