सिरीयात पकडलेले 800 दहशतवादी परत न्या- डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन: सिरीयामध्ये पकडलेले 800 दहशतवादी युरोपातील देशांनी परत न्यावेत आणि त्यांच्यावर खटले भरावेत, अशी मागणी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. युरोपातील देशांनी जर या दहशतवाद्यांना माघारी नेले नाही, तर अमेरिका सिरीयातून माघार घेण्याच्यावेळी या जिहादींना मोकळे सोडून देईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे युरोपातील सर्वच देशांमध्ये आश्‍चर्य व्यक्‍त झाले.

ट्रम्प यांनी सिरीयामधून अमेरिकेचे सैन्य माघारी बोलावण्याची घोषणा डिसेंबरमध्ये केली होती. इस्लामिक स्टेटने पुन्हा आपला जम बसवल्यास जवळपासच्या लष्करी तळावरून इसिसच्या तळांवर पुन्हा हल्ले केले जातील, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सिरीयात स्वयंघोषित खिलाफतीविरोधातील अमेरिकेच्या नेतृवाखालील लढाई आता अखेरच्या टप्प्यात आहे. या अखेरच्या टप्प्यानंतर तेथे पकडलेले सुमारे 800 दहशतवादी आपल्या ताब्यात घ्यावेत अशी सूचना अमेरिकेने ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि अन्य युरोपिय देशांना केली आहे.

या दहशतवाद्यांनी युरोपातील देशांना त्रास द्यावा, असे अमेरिकेला वाटत नाही. आता पुढील सोपस्कार करण्यासाठी इतर देशांनी पुढे यावे, अमेरिका माघार घेणार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. इराक आणि सिरीयातील भाग ताब्यात घेऊन इस्लामिक स्टेट नावाच्या संघटनेने खिलाफत स्थापन केली. या इसिसमध्ये युरोपातील दहशतवादी संघटनाही सामील झाल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)