अमेरिकेत 800 उड्डाणे रद्द, 6 हजार उशिरा ; वादळाने ख्रिसमस बिघडवला

वॉशिंग्टन (अमेरिका): अमेरिकेत आलेल्या वादळाने लोकांच्या ख्रिसमसच्या सुट्टीचा आनंद हिरावला आहे. वादळी हवामानामुळे 800 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली असून 6 हजारांहून अधिक उड्डाणे उशिरा होत आहेत. परिणामी सुट्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या लाखो लोकांचा ख्रिसमस सुट्टीच्या आनंदावर पाणी पडले आहे.

विमानांच्या उड्डाणांवर लक्ष देणाऱ्या फ्लाईटावेयर या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार 6500 पेक्षा अधिक उड्डाणांना उशीर लागत असून 800 उड्डाणे रद्द करण्यात आलेली आहेत. देशाच्या उत्तरी आणि मध्य मैदानी भागात पाऊस, बर्फवृष्टी आणि वादऴीवारे यामुऴे रस्त्याने प्रवास करणेदेखील कठीण होऊन बसले आहे. उत्तर डाकोटा राज्यातील एक महामार्ग बंद करण्यात आला असून राज्याच्या पूर्वेकडील भागात प्रवाशांनी जाऊ नये, असा सल्लाही देण्यात आलेला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)