800 टन प्लॉस्टिक जप्त 3 कोटी दंड वसूल 

मुंबई – राज्यभर प्लॉस्टिक बंदीच्या अंमलबजावणीची मोहीम अधिक कडक केली असून आतापर्यंत 800 टन प्लॉस्टिक जप्त करुन 3 कोटी रुपये दंड वसूल केल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी आज सांगितले.

प्लॉस्टिक बंदीसंदर्भात मंत्रालयात उच्चस्तरीय समितीची बैठक आज झाली. त्यावेळी कदम बोलत होते. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्लॉस्टिक पिशव्यांचा वापर होतो. हा वापर आढळल्यास देवस्थान समितीच्या प्रमुखावर कारवाई करण्यात येणार आहे. दुकानात मालाची विक्री करताना पॅकेजिंग मटेरियल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. असे प्लॉस्टिक आवरण नष्ट केले जात नाही अथवा त्याचे रिसायकलिंग केले जात नाही. त्यासाठी असे मटेरियल एकत्रपणे गोळा करुन त्याचे रिसायकलिंग करण्याची जबाबदारी उत्पादक कंपन्यांची आहे. अशा दुकानदारांनी योग्य पद्धतीने प्लॉस्टिकची विल्हेवाट लावली नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यात ज्या ज्या औद्योगिक परिसरात प्लॉस्टिक पिशव्या व अन्य साहित्य तयार करणारे कारखाने सुरु आहेत. त्यांच्यावरही धडक कारवाई करण्यात येत आहे. अलीकडेच चाकण परिसरात दोन कारखान्यावर धाडी टाकून शेकडो टन प्लॉस्टिक जप्त केले आहे. प्लॉस्टिक बंदीची मोहीम केवळ शहरी भागापूरती मर्यादित न राहता ती खेड्यापाड्यांपर्यंत राबविली पाहिजे, असे सांगतानाच जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीने यात पुढाकार घेऊन जनजागृती करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव अनिल डिग्गीकर, प्रदूषण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)