महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर 80 लाखांची रोकड जप्त

नागपुर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राज्याच्या दक्षता विभागाच्या पथकाकडून सीमा भागात तसेच महत्वाच्या रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात असून अशाच प्रकारच्या तपासणीत महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर दोन चार चाकी वाहनांमधून 80 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. हा भाग रामटेक मतदार संघात येतो.

सतनूर चेक पोस्ट जवळ एका चार चाकी वाहनातून 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली तर केदवाड चेक पोस्टवर एका वाहनातून 50 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम आयकर विभागाकडे सोपवण्यात आली असून त्यांचे अधिकारी आता या विषयाचा तपास करणार आहेत. ही रक्कम नेमकी कोणाची होती व संबंधीत गाड्या कोणाच्या मालकीच्या आहेत याचा तपशील अजून जाहीर करण्यात आलेला नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)