80 लाख वाचवल्याचे बक्षिस एक टी शर्ट, म्हणून स्वत:च चोरले 70 लाख !

नवी दिल्ली – एका व्यापाऱ्याचे 70 लाख रुपये चोरून पसार झालेल्या धनसिंग नावाच्या कर्मचाऱ्याला दिल्ली पोलीसांनी बुराडी येथे मुद्देमालासह अटक केली आहे. आझादपूर येथील एका कंपनीच्या मालकाने 27 ऑगस्ट रोजी याबाबत तक्रार नोंदवली होती.

मात्र धनसिंगने या बाबतीत जो खुलासा केला आहे, त्याने पोलीसही चक्रावून गेले आहेत. धनसिंगने आपल्या मालकाच्या 80 लाख रुपयांची चोरी होताना रोखली होती. त्याचे 80 लाख रुपये वाचवले होते. पण 80 लाख रुपये वाचवल्याबद्दल मालकाने धनसिंगला बक्षिस म्हणून दिला एक टी शर्ट.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यामुळे नाराज झालेल्या धनसिंगने मग योजनाबद्ध रीतीने मालकाच्या 70 लाख रुपयांवर डल्ला मारला आणि तो पसार झाला. यासाठी त्याने याकूब नावाच्या आपल्या मित्राची मदत घेतली. पोलीसांनी अगोदर याकूबला पकडले आणि त्याने दिलेल्या माहितीवरून धनसिंगलाही अटक केली. दरम्यान धनसिंगने 12 लाख रुपयांत एक प्लॉट खरेदी केला होता आणि अन्य छोटी-मोठी खरेदी केली होती.

पोलीसांना त्याच्याकडे 50 लाख रुपये रोख मिळाले. याकूबकडे 4 लाख रुपये रोख मिळाले. धनसिंगला 80 लाख लुटले जाण्यापासून वाचवल्याबद्दल मालकाने एक टी शर्ट बक्षिस दिल्याने धनसिंग नाराज झाल्याची गोष्ट याकूबनेच पोलीसांना सांगितली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)