80 कोटीची जमीन 1 लाखात घेण्याबाबत कपिल सिब्बल यांचे मौन

नवी दिल्ली – सुमारे 80 कोटी रुपये किमतीची जमीन केवळ एक लाख रुपयांना खरेदी केल्याच्या आरोपाबाबत माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी मौन धारण केल आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी कपिल सिब्बल यांच्यावर ग्रॅंड कॅष्तेलिनो नावाची कंपनी एक लाखात विकत घेतल्याचा आरोप केला आहे. लुटियन दिल्ली येथे ग्रॅंड कॅस्टेलिना कंपनीची जी जमीन आहे, तिची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे. या व्यवहाराबाबत त्याचप्रमाणे गुप्ता बंधूंशी असलेल्या संबंधांबाबत त्यांनी काहीही बोलणे टाळले आहे. वर्ल्डस विंडो नावाच्या भंगारचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीशी असलेल्या आपल्या संबंधांबाबतही उत्तर देण्यास त्यांनी नकार दिला.

वर्ल्डस विंडो ही 1990 साली स्थापित कंपनी पियुष गोयल यांच्या मालकीची आहे. अब्जावधीची उलाढाल असलेल्या पियुष गोयय यांनी गुप्ता बंधूंबरोबर दक्षिण आफ्रिकेत कोळशाच्या खाणीत गुंतवणूक केली. या गुप्ता बंधूंच्या बेकायदा कामांमुळे राष्ट्रपती जेकब जूमा यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ग्रॅंड कॅस्टेलिनो नावाची कंपनी सिब्बल आणि त्यांच्या पत्नीने 2016 मध्ये खरेदी केली होती. तिची मालकी पियुष गोयलच्या वर्ल्डस विंडोकडे होती. पियुष गोयलबरोबर आपले संबंध असल्याचे सिब्बल यांनी मान्य केले आहे.
अमाबुनगनेचे पत्रकार क्रेग्फ मॅक्कुल यांनी जानेवारी 2018 मध्ये सिब्बल यांनी ईमेलने काही प्रश्‍न विचारले होते. त्यात त्यांच्या सपत्निक आफ्रिका सफरीबाबत, त्यांनी खरेदी केलेल्या ग्रॅंड कॅस्टेलिनो कंपनीबाबत, तिच्या मालकीच्या 80 कोटींच्या जमिनीबाबत प्रश्‍न विचारले होते.

त्यांनी ग्रॅंड कॅस्टेलिनोची मालकी आपल्याकडे असल्याचे आज मान्य केले असले, तरी ती कधी, कोणाकडून कशी विकत घेतली याबाबत काही बोलण्यास नकार दिला आहे. ग्रॅंड कॅस्टॅलिनोची 80 कोटींची जमीन आहे की नाही, आणि कंपनी काय काम करते याबाबत काही बोलण्यास नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)