कोट्यवधीच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्यात तेलगीसह 8 जण निर्दोष मुक्त

नाशिक: महाराष्ट्रातील अत्यंत गाजलेल्या बनावट स्टॅंम्प घोटाळा प्रकरणात तेलगीसह 8 आरोपींची आज न्यायालयाने निर्दोष मुक्तता केला आहे. न्यायमूर्ती पी आर देशमुख यांच्यासमोर या खटल्याची गेले काही महिने नियमित सुनावणी चालू होती. पुराव्याअभावी न्यायाधीशांनी सर्वांची -7 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.

या प्रकरणी 49 जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी गेल्या वर्षी बेंगळुरू येथील एका सरकारी हॉस्पिटलमध्ये मरण पावला. त्याच्या शरीराचे अनेक अवयव निकामी झाले होते. मृत्यूनंतर अब्दुल करीम तेलगीवरील सर्व आरोप काढून घेण्यात आले होते.

एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मुलगा आणि माजी ट्रॅव्हल एजंट अब्दुल करीम लाडसाब तेलगीचे बनावट स्टॅंप घोटाळ्याचे जाळे 18 राज्ये, 70 शहरे आणि 350 एजंटसमध्ये पसरलेले होते. सन 2001 मध्ये कर्नाट्‌क पोलीसांनी त्याला अटक केली होती. 25 ओॅगस्ट 2004 मध्ये सीबीआयने आरोपपत्र दाखल केले होइते. तेलगीने रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी संगनमत करून हा स्टॅम्प चोरीचा प्रकार सुरू केला होता.

अनेक प्रकरणात त्याला 2007 साली 30 वर्षे तुरुंगवास आणि 202 कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला होता. हा स्टॅंप घोटाळा 30, हजार कोटी रुपयांचा असल्याचे आणि त्यात राजकारणी, नोकरशहा आदी अनेकांचा संबंध असल्याचे बोलले जात होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)