युपीत टेम्पो झोपडीत घुसल्याने 8 ठार

चंदोली : गुरे घेऊन जाणारा एक टेम्पो झोपडीत घुसल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेत आठ जण ठार झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील मालदह गावात घडली. मालदह गाव बिहार-उत्तर प्रदेशच्या सीमाभागात आहे.
मंगळवारी पहाटे गुरे घेऊन जाणारा एक टेम्पो ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने झोपडीत घुसला. काळूराम याच्या मालकीच्या झोपडीत झोपलेल्या व्यक्तींपैकी 8 जागेवरच ठार झाल्या. यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे.

मृतांमध्ये रामकिशन (25), सुहागिन (22), गोलू (8), निशा(10) मोनी(6) मोलू(5) सामादेवी (60) यांचा समावेश आहे. मालक काळूराम मात्र घरात नसल्यामुळे बचावला आहे. हा गुरांच्या तस्करीचा प्रकार असून पोलीसांना त्याची कल्पना होती, असे लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी पोलिसांना मृतदेह हलवण्यास विरोध करत दगडफेक करून पोलीसांना पळवून लावले. ही माहिती मिळताच तेथे मोठा फौजफाटा पाठविण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)