उत्तर प्रदेशात भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू ; 30 जण जखमी

ग्रेटर नोएडा – उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामध्ये झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. यमुना एक्स्प्रेस वेवर बसनं ट्रकला धडक दिली. रबूपुरा भागात झालेल्या या अपघातात 30 जण जखमी झाले. त्यांच्यावर जेवरमधील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. आज पहाटे 5 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. याबद्दलची माहिती मिळताच पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी अपघाताची चौकशी सुरू केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी याबद्दल ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.

https://twitter.com/ANINewsUP/status/1111463222144577540

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)