8 सुरक्षाकर्मींच्या रायफल्स पळवून एसपीओ बनला दहशतवादी

पीडीपी आमदाराचे पिस्तूलही पळवले

श्रीनगर – पीडीपी आमदार एजाज मीर यांचा एसपीओ आदिल बशीर आमदारांचे पिस्तूल आणि त्यांच्या 8 सुरक्षाकर्मींच्या रायफल्ससह हिजबूल मुजाहिदीनचा दहशतवादी बनला आहे. हिजबूलने आदिल रशीदचा शस्त्रांसह फोटो सोशल मीडियावर टाकून त्याची पुष्टी केली आहे. आदिल रशीद शुक्रवारपासून शस्त्रांसह फरारी होता.

-Ads-

शोपियाच्या वाचीचेआमदार एजाज मीर यांच्या आग्रहावरूनच त्यांचा गाववाला आदिल रशीदला त्यांचा एसपीओ म्हणून नियुक्त केले होते. एजाज मीर यांच्या श्रीनगरच्या राजबाग येथील निवासातून आदिल रशीद एजाज मीर यांचे पिस्तुल आणि त्यांच्या सुरक्षाकर्मींच्या 8 रायफल्ससह शुक्रवारी फरारी झाला होता.

हा प्रकार झाला तेव्हा आमदार एजाज मीर काश्‍मीरच्या बाहेर होते, आणि त्यांनी आपल्या जाण्याबाबत काही माहिती दिली नव्ह्ती. त्यांच्या सुरक्षा दलातील सुरक्षाकर्मींनीही रजा मंजूर करून घेतली नव्हती आणि आपली शस्त्रे जमाही केली नव्हती. या सर्व गोष्टी संशयास्पद असून त्यांची चौकशी केली जात आहे. एजाज मीर यांच्या आठपैकी सात सुरक्षाकर्मींना त्वरित निलंबित करून अटक करण्यात आलेली आहे.

आदिल रशीद याच्याबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर पडत आहेत. आदिल रशीद हा जेनपोरा शोपियामधील एक नामवंत “पत्थरबाज’ समजला जात होता. त्याच्याविरुद्ध शोपिया आणि जेनपुरा येथे एफआयआर दाखल करण्यात आलेले आहेत. असे असूनही त्याची एसपीओ म्हणून नियुक्ती कशी करण्यात आली हा एक संशयाचा भाग आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की आमदारांच्या आग्रहामुळेच आदिल रशीदला त्यांच्या सुरक्षा पथकात एसपीओ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. एजाज मीर दहशतवाद्यांना आपले भाईबंद मानत होते. काश्‍मीरमध्ये बंदूक चालवणारे सक्रिय दहशतवादी नसून आपले भाईबंद आहेत, असे एजाज मीर यांनी विधानसभेत संगितले होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)