79 हजार ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात यश

पुणे – रुपी बॅंकेवर नेमण्यात आलेल्या प्रशासकीय मंडळाच्या वतीने गेल्या दोन ते अडीच वर्षांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे बॅंकेला सुमारे 79 हजार ठेवीदारांच्या ठेवी परत देण्यात यश आले आहे.

बॅंकेची कर्जवसुली सुद्धा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. चालू वर्षात म्हणजे 29 नोव्हेंबरपर्यंत 24 कोटी रुपयांची वसुली करण्यात बॅंकेला यश आले आहे. मार्च प्रयत्न ही वसुली 55 कोटी रुपयांपर्यत नेण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ते निश्‍चित पूर्ण होईल, असा विश्‍वास प्रशासकीय मंडळाला आहे. उद्दिष्ट पूर्ती झाल्यास बॅंकेला साडेपाच कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे.

-Ads-

कर्ज वसुलीसाठी बॅंकेने प्रभावी उपाययोजना राबविणे सुरू केले आहे. त्यात मालमत्तेवर टाच आणणे, लिलाव पुकारणे,या बरोबरच बॅंकेची फसवणूक केलेल्या कर्जदारांवर तसेच बेपत्ता कर्जदार, जामिनदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करणे. या उपाययोजनांचा समावेश आहे. एकरकमी कर्जवसुलीचे प्रस्ताव दाखल करून घेऊन 2000 पूर्वीच्याही थकबाकीदारांकडून कर्जवसुली केली आहे, असेही प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडीत यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)