78,717 शाळा झाल्या तंबाखूमुक्‍त

– पुण्यासह 26 जिल्ह्यांत अभियान सुरू

पुणे – तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम माहिती असूनही वयवर्षे 7 ते 18 वयोगटातील पाचशेहून अधिक लहान मुले तंबाखूच्या आहारी जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्यात राबविण्यात येत असलेल्या तंबाखूमुक्‍त अभियानांतर्गत 78 हजार 717 शाळा तंबाखूमुक्‍त झाल्या आहेत. आता उर्वरीत पुण्यासह 26 जिल्ह्यांत अभियान राबविले जात असल्याची माहिती हेल्थ फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट यांच्याकडून देण्यात आली.

तंबाखूच्या विळख्यातून महाराष्ट्राला मुक्त करण्यासाठी संबंध हेल्थ फाउंडेशन आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातून राज्यभर हे अभियान राबविले जात आहे. तंबाखूच्या आहारी जाणाऱ्या मुलांची संख्या चिंताजनक असून मुलांना तंबाखूच्या सवयीपासून रोखण्यासाठी 10 जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक प्रकल्प म्हणून तंबाखूमुक्त अभियानांतर्गत तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञानाचा उपक्रम राबविण्यात आला. त्या प्रकल्पांतर्गत 10 जिल्ह्यातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून “सिगारेट्‌स ऍन्ड अदर टोबॅको प्रोडक्‍ट्‌स ऍक्‍ट’ (कोटपा) या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

1 लाख 8 हजार शाळांपैकी पहिल्या टप्पात 78 हजार 717 शाळा या तंबाखूमुक्त झाल्या आहेत, असा दावा करण्यात आला आहे. तर राज्यात आजमितीला खासगी इंग्रजी, मराठी माध्यमाच्या 30 ते 35 हजार शाळा कार्यरत आहेत. आता पुण्यासह उर्वरित जिल्ह्यांतील शाळांसह सर्वत्र हा अभियान सुरू आहे. दहा जिल्ह्यांमध्ये जळगाव, नाशिक, अमरावीत, अकोला, नागपूर ,वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्य 26 लाख 50 हजार विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीची प्रतिज्ञा घेतली. आता अन्य 26 जिल्ह्यातील सरकारी, खासगी शाळांमध्ये जनजागृती केली जाणार आहे,’ अशी माहिती संस्थेच्यावतीने दीपक छिब्बा यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)