मेक्‍सिकोच्या सीमेवरील भिंतीसाठी पेंटॅगॉनकडून 787 दशलक्ष डॉलर

वॉशिंग्टन डी.सी – अमेरिका आणि मेक्‍सिकोच्या सीमेवर भिंत उभारण्यासाठी पेंटॅगॉनने दोन बांधकाम कंपन्यांना मिळून 787 दशलक्ष डॉलर दिले आहे असल्याची माहिती अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिली आहे. ऍरिझोनातील टस्कॉन भागातील या भिंतीच्या आरेखनासाठी आणि भिंतीच्या बांधकामासाठी मेक्‍सिकोतल्या अल्बुकर्क येथील “साऊथ ईस्ट व्हॅली कन्स्ट्रक्‍शन’ कंपनीला या कामासाठी 6 कोटी 46 लाख डॉलर देण्यात आले आहेत, असे संरक्षण विभागाच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे.

याशिवाय बीएफबीसी एलएलसी या कंपनीलाही अल सेन्ट्रो आणि युमा या शहरांदरम्यान भिंत बांधण्याच्या कामासाठी 142 दशलक्ष डॉलरचे कंत्राट देण्यात आले आहे. अमेरिकेच्या दक्षिणेकडील चार सीमांवर अशाप्रकारे भिंत बांधण्याचे संरक्षण विभागाने निश्‍चित केले आहे. अल सेन्ट्रो, युमा, टस्कन, अल पासो या शहरांच्या जवळ अशी पोलादी भिंत बांधण्यात येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या आठवड्यात पेन्टागॉनने या 80 मैल लांबीच्या भिंतीच्या कामासाठी 1.5 अब्ज डॉलर हस्तांतरित करण्यास मंजूरी दिली. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेवरून पेंटॅगॉनने ही मंजूरी दिली आहे. ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणूक प्रचारादरम्यान अशी सीमा भिंत बांधण्याचे आश्‍वासन दिले होते. या भिंतीसाठी आवश्‍यक निधी मंजूर करण्यावर ठाम राहून ट्रम्प यांनी फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)