78 वा औंध संगीत महोत्सव साजरा

औंध ः महोत्सवात शास्त्रीय गायन करताना कलाकार.

औंध, दि. 30 (वार्ताहर) – कलेचा वारसा लाभलेल्या औंधनगरीमध्ये स्वामी शिवानंद प्रतिष्ठान औंध संगीत महोत्सवदिग्गज कलाकारांनी कला सादर करून औंध महोत्सव साजरा झाला.
सकाळी 9 वा मान्यवरांच्या उपस्थितीत स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करून व भूषण जाधव व दत्तात्रय जाधव यांच्या शहनाई वादनाने कार्यक्रमास सुरुवातझाली. असगर हुसेन यांचे व्हायोलिन वादन झाले. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे यांनी केली. पंडित गजाननबुवा जोशी याची नात कु.पल्लवी जोशी यांनी राग बिभास मध्ये बडा ख्याल – अलबेलो मेरो-ताल तीलवाडा मध्ये व ताल त्रिताल मध्ये -कस्कुवरवा जाईल हमरा ही द्रुत बंदिश सादर केली. पहिल्या सत्राची सांगता भाग्येश मराठे यांच्या गायनानी झाली.
दुसऱ्या सत्राची सुरुवात स्वप्नील भिसे यांच्या तबला सोलो वादनांनी झाली. त्यानंतर पंडित अरुण कशाळकर यांचे गायन झाले. त्यानंतर “रियाझ’ या स्मरणिकेचे तसेच पंडित अंतुबुवा जोशी, गजानन बुवा जोशी व औंध संगीत महोत्सवात आलेल्या अनेक कलाकारांची दुर्मिळ छायाचित्रांचे इ बुकचे प्रकाशन प्रा. प्रवीण भोळे सर यांच्या हस्ते झाले. सत्राची सांगता श्रीमती आभा वामबुरकर ह्यांची कथकने झाली. तिसऱ्या सत्राची सुरुवात पं. गजाननबुवा जोशी यांची नात व बच्चूभाई यांची कन्या सौ. अपूर्वा गोखले यांच्या गायनाने झाली.
78 व्या औंध संगीत महोत्सवाची सांगता पं. गजाननबुवा यांच्या ज्येष्ठ शिष्या पंडिता शुभदा पराडकर यांच्या गायनाने झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)