75 रुपयाचे नाणे चलनात येणार 

नवी दिल्ली: लवकरच 75 रुपयांचे नाणे चलनात येणार आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे प्रथम तिरंगा फडकावल्याच्या घटनेला 75 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून सरकार 75 रुपयांचे नाणे चलनात आणणार आहे. यासंदर्भातील नोटिफिकेशन अर्थ मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

या नव्या 75 रुपयांच्या नाण्यावर सेल्युलर जेलच्या मागे तिरंग्याला सलामी देत असलेल्या नेताजींचे चित्र असेल. तसेच नाण्यावर देवनागरी आणि इंग्रजीत प्रथम ध्वजारोहण दिवस असे लिहिलेले असेल. चलनात येणारे 75 रुपयांच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)