72 खोडीच्या बॅचचा स्नेह मेळावा होणार सातासमुद्रापलीकडे

वाई ः स्नेहमेळाव्यातील सहभागी माजी विद्यार्थी.

वाईतील द्रविड हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा इंडोनेशियाच्या बाली बेटावर
वाई, दि. 15 (प्रतिनिधी)- येथील द्रविड हायस्कूलने अनेक मान्यवर हिरे घडविले. अनेक विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशामुळे द्रविड हायस्कूल-वाई हे नाव संपूर्ण भारतात प्रसिध्द झाले आहे. अशा मान्यवर शाळेचे 1972 सालचे माजी विद्यार्थी दरवर्षी माजी विद्यार्थी स्नेहमेळावा भरवून आपली शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करीत असतात. संपूर्ण भारतात सेवा, संगणक, लष्कर, वैद्यकीय, कायदे विषयक सारख्या विविध क्षेत्रात हे विद्यार्थी आपल्या शाळेची बिरुदावले उंचावत असतात. 1972 साली आकरावी (जुनी मॅट्रीक) झालेले विद्यार्थी आपले स्नेहसंमेलन दरवर्षी महाराष्ट्रभर भरवित असतात. हे विद्यार्थी त्याकाळी अतिशय खोडकर असल्याने शाळेच्या मुख्याद्यापकांनी या बॅचाला 72 खोडीची बॅच असे नाव ठेवले होते. नावाप्रमाणे या बॅचने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत राहून आपला वेगळा ठसा उमटवून द्रविड हायस्कूलचे नाव उंच शिखरावर नेवून ठेवले.
या बचचे हे 46 वे स्नेहसंमेलन यावर्षी सातासमुद्रापलिकडे इंडोनेशिया देशात बाली या बेटावर आयोजित केले आहे. 18 नोहेंबर ते 24 नोहेंबर 2018 या कालावधीत असणार आहे. हे विद्यार्थी एवढे प्रतिभावंत होते की 1972 सालच्या या बॅचचा निकाल 100 टक्के लागला होता. याचा सार्थ अभिमान शाळेच्या मुख्याद्यापकांना होता. या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सलग अव्याहतपणे 45 वर्षे भरविण्यात आले आहे, हे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. कोल्हापूर, सातारा, वाई, पुणे, मुंबई, वाशी, गणपतीपुळे अशा अनेक शहरात ही स्नेहमेळावे घेण्यात आलेली आहेत. ही गोष्ठ द्रविड हायस्कूलच्या इतिहासात एकमेव घडणारी अशी आहे. प्रत्येक स्नेहमेळाव्यात ही बॅच आपल्या गुरुजनांचा सन्मान करते, शाळेला भेट दिली जाते, शाळेच्या विविध उपक्रमात हे विद्यार्थी आपल्या परीने योगदान देतात. दरवर्षी होणाऱ्या स्नेहमेळाव्याचे आयोजन प्रा. विष्णू खरे, यशवंत ओतारी, विनय पोरे, अनिल जोशी, हरी खटावकर, आणि अरविंद गरगटे व काही इतर माजी विद्यार्थी करीत असतात.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)