जिल्ह्यातील 23 धरणांत 71 टक्‍के पाणी

संग्रहित छायाचित्र

128 टीएमसी साठा : 8 महिन्यांचे काटेकोर नियोजन आवश्‍यक

पुणे – जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील 23 धरणे मिळून एकूण सुमारे 128 टीएमसी म्हणजे 71 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पुढील आठ महिने उपलब्ध असलेल्या पाणी नियोजन काटेकोरपणे करण्यासाठी जलसंपदा विभागाची कसोटी लागणार आहे.

यंदा मान्सूनचे आगमन वेळेवर झाले. त्यानंतर दोन महिने पावसाने चांगली हजेरी लावल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. त्यामुळे जिल्ह्यातील भिमा खोऱ्यातील धरणातील पाणी नदीतून खाली सोडण्यात आले. नदीतून सोडलेले पाणी उजनी धरणात येते. त्यामुळे मृतसाठा शिल्लक असलले उजनी धरण यंदा 100 टक्के भरले. उजनीहून 100 टक्के भरल्याने उजनीतूनही पाणी सोडण्यात आले होते.

त्यानंतर मात्र परतीच्या पावसाने निराशा केली. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस न झाल्याने धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही. त्यामुळे पाणीसाठा स्थिर राहिला. यंदा शासनाने जिल्ह्यातील 13 पैकी 10 तालुक्‍यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी आत्ताच होत आहे. काही धरणातील कालव्यातून तसेच नदीपात्रातून शेतीसाठी पाणी सोडण्यात आले आहे. मात्र तीन -तीन महिन्यांनंतर पाणी सोडण्याची मागणी अधिक तीव्र होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन जबाबदारी जलसंपदा विभागाच्या खांद्यावर असणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)