700 कुटुंबांची पालिकेच्या शाळेत व्यवस्था

नगरसेवक घाटेंकडून दोन वेळच्या जेवणाची सोय

पुणे : महापालिकेकडून दांडेकर पूल वसाहतीमधील घरात कालव्याचे पाणी घुसलेल्या 700 कुटुंबांची व्यवस्था महापालिकेच्या रायगडची सर्जेराव साळवे शाळेतील 5 खोल्या तसेच धर्मवीर संभाजी शाळेमधील 8 खोल्यांमध्ये करण्यात आली आहे, तसेच महापालिकेकडून या भागातील नागरिकांसाठी रात्रीच्या जेवणाची पाकिटे दिली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, या भागातील नागरिकांच्या घरातील संसार वाहून गेल्याचे पाहून स्थानिक नगरसेवक धीरज घाटे यांच्याकडून या भागातील सुमारे 2 हजार लोकांच्या दुपारच्या जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच जे नागरिक घराच्या परिसरातच राहणार आहेत. त्यांच्या जेवणाची सोयही घाडे यांच्याकडूनच उपलब्ध करून देण्यात आली. महापालिकेच्या टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालय आणि कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या सिमेवर ही घटना घडलेली असल्याने या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयांकडून नागरिकांना महापालिकेने उपलब्ध केलेल्या जागेत रात्री मुक्काम करण्याची विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)