नवाज शरीफ यांना भ्रष्टाचाराबद्‌ल 7 वर्षाचा कारावास

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणात आज सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लिक प्रकरणात त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली असली तरी त्यांना अल अझिझिया स्टील मिल प्रकरणात दोषी ठरवून ही शिक्षा देण्यात आली आहे.

अकाऊंटीबिलीटी कोर्टाचे न्यायाधिश महंमद अर्शद मलिक यांनी हा निकाल दिला. त्यांनी आपल्या निकालपत्रात म्हटले आहे की अल अझिझीया स्टील कंपनीच्या प्रकरणात त्यांच्या भ्रष्टाचाराचे सबळ पुरावे सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आले आहेत. आज हा निकाल ऐकवण्यात आला तेव्हा 68 वर्षीय शरीफ न्यायालयात उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जुलै 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शरीफ यांना देशातील कोणतीहीं निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवले होते. त्या पाठोपाठ त्यांना बसलेला हा दुसरा मोठा दणका आहे. शरीफ यांच्याविरोधात अकाऊंटीबिलिटी कोर्टापुढे भ्रष्टाचाराचे एकूण तीन खटले चालवण्यात आले. यातील ऍव्हेन फिल्ड प्रॉपर्टीजच्या प्रकरणात शरीफ यांना या आधीच 11 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.

याच प्रकरणात त्यांच्या कन्या मरियम यांना आठ वर्षांची तर जावई कॅप्टन मोहंमद सफदर यांना एक वर्षाची शिक्षा झाली आहे. शरीफ कुटुंबियांनी पाकिस्तानातील भ्रष्टाचारात कमावलेल्या पैशांतून ब्रिटन मध्ये चार मोठे फ्लॅट खरेदी केल्याचे हे प्रकरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)