पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी 7 नायजेरियन ताब्यात

मुंबई: मुंबईतील भायखळा येथे नायजेरियन ड्रग्ज माफियांनी पोलिसांवर गोळीबार केल्याचा धक्‍कादायक प्रकार घडला. भायखळात अशा प्रकारची गंभीर घटना पहिल्यांदाच घडली असून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सगळ्यांची कसून चौकशी सुरु आहे.

मुंबईतील भायखळा भागात नायजेरिनय ड्रग्ज माफिया आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारला. छापा मारल्यानंतर नायजेरिन नागरिकांना पकडण्यासाठी पोलीस पुढे सरसावले असता काहींनी पोलिसांवर गोळीबार केला. या प्रकरणी पोलिसांनी पुन्हा फायरिंग करत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या सगळ्यांकडे बंदुका आल्या कशा याचीही माहिती पोलीस मिळवत आहेत. याशिवाय त्यांचा अन्य काही गुन्हात सहभाग असण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)