तामिळनाडूतल्या मंदिरातल्या चेंगराचेंगरीत 7 ठार

तिरुचिरापल्ली (तमिळनाडू) – तामिळनाडूतल्या एका स्थानिक मंदिरातल्या एका समारंभाप्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये किमान 7 जण मरण पावले आहेत, तर अन्य 10 जण जखमी झाले आहेत. थुरियूर येथील मंदिरामध्ये ही घटना घडली.

चितिरा पौर्णिमेच्या निमित्ताने मुथियापलम गावात कुरुप्पासामीच्या मंदिरात झालेल्या समारंभात मंदिरामधील प्रसाद म्हणून नाणी वाटली जात असताना ही चेंगराचेंगरी झाली. मरण पावलेल्यांमध्ये 4 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर जखमी झालेल्या अन्य 10 जणांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. या समारंभात प्रसाद म्हणून नाणी वाटली जात असतात. ही नाणी घरातील पैशाच्या भांड्यात ठेवली असता समृद्धी येते असा येथील गावकऱ्यांमध्ये समज आहे. या विधीसाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेऊन देवस्थानाच्यावतीने गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी कोणतीही उपाय योजना करण्यात आलेली नव्हती, असे समजते आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)