मेक्‍सिकोतील एका बार मध्ये गोळीबारात 7 ठार

मेक्‍सिको शहर: मेक्‍सिको मधील कॅरेबियन कोस्टल भागात असलेल्या प्लाया डेल कारमेन गावातील एका बार मध्ये काल रात्री झालेल्या गोळीबारात सात जण ठार तर अन्य एक जण जखमी झाला आहे. लास व्हर्जिनिया नावाच्या बार मध्ये रविवारी रात्री हा प्रकार घडला. हल्लेखोर नेमके किती होते याचीही माहिती लगेच मिळू शकलेली नाही.

एरवी हे एक शांत शहर होते. तथापी तेथे गेल्या दोन दशकांत मोठी नागरी वस्ती वाढली आहे. त्याच बरोबर तेथे गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यातूनच गोळीबार आणि हत्यांचे सत्र तेथे सुरू झाले आहे. गेल्या वर्षभरात या भागात तब्बल 688 जणांच्या हत्या झाल्या आहेत. मादक द्रव्यांचा चोरटा बाजार करणाऱ्या टोळ्यांचा येथे मोठ्या प्रमाणात वावर आहे. त्या टोळ्यांमध्ये या भागात नेहमी गॅंगवॉर होत असतात.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)