राहाता – शिर्डी विधानसभा मतदार संघातील काकडी, कोऱ्हाळे, नांदुर्खी, साकुरी, संगमनेर-लोणी व संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा रस्त्यांच्या कामासाठी सात कोटी सात लाख रुपयांचा निधी गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे मंजुर झाला आहे.
काकडी, कोऱ्हाळे, नांदुर्खी व साकुरी या चारही गावांमधून जाणारी वाहतूक विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या चारही गावांना जोडणाऱ्या रस्त्यात सुधारणा व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली होती. ना. विखे पाटील यांनी प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे या रस्त्याच्या कामासाठी आता 85 लाख 33 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला असुन, या निधीतून पूर्ण होणाऱ्या या रस्त्याच्या कामाचा मोठा दिलासा ग्रामस्थांना मिळणार आहे.
नगर व नाशिक जिल्ह्यांना जोडणारा मार्ग म्हणून ओळखल्या जाणारा संगमनेर, लोणी हा राज्य मार्ग वाहतुकीसाठी महत्त्वाचा असल्याने या रस्त्यासाठी दोन कोटी 91 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमनेर, लोणी, श्रीरामपूर नेवासा या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी तीन कोटी 30 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, येत्या वर्षभरात ही कामे मार्गी लागणार आहेत.