इंडोनेशियात पुन्हा भूकंप, त्सुनामीचा धोका

नवी दिल्ली – इंडोनेशिया शहर शुक्रवारी 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाच्या धक्क्यांने हादरले आहे. भूकंपानंतर इंडोनेशियन आपत्ती विभागाकडून इंडोनेशिया आणि आसपासच्या भागात त्सुनामी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हा भूंकप ‘सुलावेसी व्दीप’च्या जवळच्या परिसरात झालाय. अमेरिकी भौगोलिक सर्वेक्षण विभागाने सांगिलते की, बोर्नियो शहराच्या पूर्व भागात ‘सुलावेसी व्दीप’ जवळ 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूंकपाची नोंद झाली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान इंंडोनेशिया पॅसिफिक रिंग आॅफ फायर वर स्थित असल्याने त्याठिकाणी नियमित भूंकप होत राहतात. यापूर्वी लोम्बोक बेटावर ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप आला होता. यात १७ जण ठार झाले होते.

२००४ मध्ये इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर ९.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता. परिणामी नंतर आलेल्या त्सुनामीमुळे भारतासह अनेक देशांमध्ये २ लाख २० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. इंडोनेशियातच यापैकी १ लाख ६८ हजार बळी गेले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)