नैसर्गिक आपत्तीग्रस्त राज्यांसाठी 7.214.03 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 4714.28 कोटी रुपयांची मदत

नवी दिल्ली : देशातल्या नैसर्गिक आपत्तीग्रस्त 6 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाला केंद्र सरकारकडून 7,214.03 कोटी रुपयांची मदत देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने आज मंजूरी दिली. यात महाराष्ट्राला दुष्काळ निवारण योजनांसाठी 4,714.28 कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. तसेच हिमाचल प्रदेशात पूर आणि भूस्खलन यासाठी 317.44 कोटी रुपये, उत्तर प्रदेशात पुरामुळे झालेल्या नुकसानीसाठी 191.73 कोटी रुपये, आंध्र प्रदेशच्या दुष्काळ निवारणासाठी 900.40 कोटी रुपये, गुजरातमध्ये दुष्काळ निवारणासाठी 127.60 कोटी रुपये, कर्नाटक दुष्काळासाठी 949.49 कोटी रुपये तर पुदुच्चेरी येथे वादळामुळे झालेल्या नुकसानासाठी 13.9 कोटी रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागणाऱ्या या राज्यांना केंद्राकडून अतिरिक्त मदत देण्यासाठी आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

आज झालेल्या बैठकीत केंद्रीय वित्त मंत्री पियूष गोयल, कृषी मंत्री राधा मोहन सिंग तसेच गृहविभाग, वित्त विभाग, कृषी विभाग आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)