7 लाख शरणार्थ्यांच्या संरक्षणाची ट्रम्प यांची ऑफर

मात्र डेमोक्रॅटिक सदस्यांनी प्रस्ताव फेटाळला

वॉशिंग्टन: अमेरिकेमधील “शटडाऊन’संदर्भात अध्यक्ष ट्रम्प यांनी एक तोडगा सुचवलेला आहे. अमेरिकेत आलेल्या आणि कोणतीही कागदपत्रे नसलेल्या 7 लाख शरणार्थ्यांना संरक्षण देण्याची तयारी ट्रम्प यांनी दर्शवली आहे. मेक्‍सिकोच्या सीमेवरील महत्वाकांक्षी भिंतीच्या उभारणीसाठी 5.7 अब्ज डॉलरच्या निधीच्या बदल्यात ट्रम्प यांनी ठेवलेला हा प्रस्ताव डेमोक्रॅटिक सदस्यांनी फेटाळून लावला आहे. ट्रम्प यांनी आगोदर फेडरल सरकारांच्या विभागांना खुले करावे, अशी मागणी डेमोक्रॅटिक सदस्यांनी केली आहे.

ट्रम्प यांनी काल व्हाईट हाऊसमधून केलेले भाषण टिव्हीवरून प्रसारीत करण्यात आले. सुमारे 7 लाख शरणार्थ्यांना लहान मुले समजून अमेरिकेमध्ये पाठवण्यात आले आहे. या सर्व शरणार्थ्यांना “स्वप्नाळू’ असेही ट्रम्प यांनी संबोधले आहे. याशिवाय नैसर्गिक आपत्ती किंवा हिंसाचारामुळे देश सोडून आलेल्या सुमारे 3 लाख शरणार्थ्यांनाही तात्पुरते संरक्षण देण्याची तयारीही ट्रम्प यांनी दर्शवली आहे.

अमेरिकेच्या नागरिक प्रवेशकेंद्रांवर अमली पदार्थ तपासणी तंत्रज्ञान बसवण्यास 805 दशलक्ष डॉलर आणि तातडीच्या मानवतावादी सहकार्यासाठी 800 दशलक्ष डॉलरच्या निधीचीही ट्रम्प यांनी मागणी केली आहे. सीमा सुरक्षेसाठी तातडीच्या उपाययोजनांचा प्रस्तावही ट्रम्प यांनी मांडला आहे. शरणार्थ्यांमध्ये विश्‍वास आणि सद्‌भावना वाढीसाठी या उपाय योजना आवश्‍यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मेक्‍सिकोच्या सीमेवरील प्रस्तावित भिंतीसाठीच्या निधीमुळे ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आणि डेमोक्रॅटिक सदस्यांमध्ये सरळ सरळ उभे तट पडले आहेत. यामुळे निर्माण झालेले “शटडाऊन’ गेल्या 29 दिवसांपासून सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
3 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)