7 महिन्यात 23 हजार जणांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी विभागाच्या वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते जुलै या सात महिन्याच्या कालावधीत 23 हजार 430 बेशिस्त वाहतूकदारांवर कारवाई केली आहे. त्याद्वारे 58 लाख 11 हजार 830 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

यामध्ये 1 हजार 639 लोकांवर विरुध्द दिशेने गाडी चालवणे, 1 हजार 220 जणांवर “नो पार्कींग’, 1 हजार 65 जणांवर गाडीला जॅमरची कारवाई, 818 जणांवर मोबाईलवर बोलत गाडी चालवल्याबद्‌द्‌ल, 850 जणांवर ट्रीपल सीट, 243 जणांवर पादचारी मार्गावर वाहने उभी करणे, 17 हजार 640 जणांवर सिग्नल मोडणे, “झेब्रा क्रॉसींग’वर उभे राहणे, हेल्मेट न वापरणे आदींबाबत कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, वाहतूक पोलिसांकडून जनजागृती, कारवाई होत असताना वाहतुकीला शिस्त लागत नसल्याचे सात महिन्यातील कारवाईच्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. बेशिस्त वाहन चालक पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरही गाडी घालायला मागे पुढे पाहत नसल्याचे मागील काही घटनांवरुन समोर आले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचारी जीव मुठीत धरुन कारवाई करतात. ही आकडेवारी केवळ पिंपरी विभागाची असून शहरात वाहतूक नियमांची नागरिकांकडून “एैसी तैसी’ होत असल्याचे स्पष्ट होत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)