7 पिस्तूल, 26 काडतूस जप्त

पिंपरी – मोशी येथील मार्केट यार्ड चौकात सापळा रचून गुन्हे शाखा युनिट 2 च्या पोलीस पथकाने एका सराईताकडून 2 लाख 29 हजार रुपये किंमतीच्या तब्बल 7 गावठी पिस्तूल आणि 26 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.

योगेश बाजीराव दौंडकर (वय-35, रा. मारुती मंदिराजवळ, शेल पिंपळगाव, ता. खेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि.20) गुन्हे शाखा युनिट 2 चे पथक चिखली पोलीस ठाणे हद्दीत गस्त घालत असताना पोलीस कर्मचारी दत्तात्रय बनसुडे यांना त्यांच्या खबऱ्याकडून माहिती मिळाली की, एका काळ्याच्या रंगाच्या दुचाकीवरुन एक इसम मोशी येथील जुना जकातनाका मार्केटयार्ड येथे गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. यावर युनिट 2 च्या पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आरोपी योगेश दौंडकर याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतील असता त्याच्याकडे एक देशी पिस्टल आणि पाच जिवंत काडतूस आढळून आली.

पोलिसांनी त्याच्या दुचाकीची (क्र. एमएच/14/डीआर/9322) झडती घेतली असता डीकीमध्ये लाल रंगाच्या पिशवीत एक गावठी पिस्टल आणि 6 जिवंत काडतुसे आढळून आली. आरोपीकडून असे एकूण 2 देशी पिस्तूल आणि अकरा जिवंत काडतूस आढळून आली. पोलीसांनी ती जप्त करुन योगेश याला अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याच्या चांदुस कोरेगाव येथील फार्म हाऊसमध्ये आणखी पाच देशी बनावटीच्या पिस्तूल आणि 16 जिवंत काडतुसे लपून ठेवल्याचे सांगितले. पोलीसांनी त्या ठिकाणी जाऊन तो ऐवज जप्त केला. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट 2 चे सहायक पोलीस निरीक्षक सतिश कांबळे करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)