68  दहशतवाद्यांना न सोडण्याचा पाक सर्वोच्च न्यायालयाचा आदेश 

पेशावर (पाकिस्तान): पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने 68 दहशतवाद्यांना न सोडण्याचा आदेश दिला आहे. यापूर्वी या 68 दहशतवाद्यांना सोडण्याचा पेशावर उच्च न्यायालयाने दिलेला आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. पाकिस्तानच्या लष्करानेच प्रशिक्षण दिलेले हे दहशतवादी असून लष्कराबरोबर झालेल्या मतभेदांनंतर या दहशतवाद्यांना विविध प्रकरणामध्ये अडकवून लष्करी न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती.

आपल्याला झालेल्या शिक्षेविरुद्ध या सर्व आरोपींनी पेशावर उच्च न्यायालयात अपील केले होते. त्यावर निकाल देताना 18 ऑक्‍टोबर रोजी लष्करी न्यायालयाचा आदेश रद्द करून पेशावर उच्च न्यायालयाने या 68 दहशतवाद्यांना मुक्त केले होते.

-Ads-

पेशावर उच्च न्यायालयाच्या आदेशाला लष्कराच्या वतीने संरक्षण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात आव्हाने दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश रद्द करून सर्वच्या सर्व 68 आरोपींना न सोडण्याचा निर्णय दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)