कर्नाटकात पोटनिवडणुकीसाठी 67 टक्के मतदान; मंगळवारी निकाल 

बंगळूर – कर्नाटकात राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेच्या बनलेल्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी सुमारे 67 टक्के मतदान झाले. पोटनिवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होईल. लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या दोन जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली. लोकसभा जागांच्या तुलनेत विधानसभा मतदारसंघांमध्ये अधिक मतदान झाले. पोटनिवडणुकीत 31 उमेदवारांचे भवितव्य पणाला लागले आहे. मात्र, खरी लढत त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेस-जेडीएस आघाडीत आणि भाजपमध्येच आहे.

कॉंग्रेस-जेडीएस आघाडी पोटनिवडणुकीला एकत्रितपणे सामोरी गेली. त्यामुळे सत्तारूढ आघाडीच्या लोकप्रियतेची परीक्षा म्हणून पोटनिवडणुकीकडे पाहिले जात आहे. तिचा निकाल राज्याच्या राजकीय स्थितीवर परिणाम करणारा ठरेल, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे. पोटनिवडणुकीत आघाडीला चांगले यश मिळाल्यास पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपशी संघर्ष करण्यासाठी देशपातळीवर महाआघाडी स्थापन करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना बळ मिळेल. दरम्यान, कर्नाटकमधील आघाडी सरकारच्या टिकावाबाबत भाजपकडून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोटनिवडणुकीच्या निकालानंतर आघाडी सरकारचे पतन सुरू होईल, असे भाकित त्या पक्षाकडून केले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)