नागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त

नागपूर – नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी एका प्रवाशाकडून 67 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रक्कम चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्‍स्प्रेसमधून रेल्वे सुरक्षा दलाने जप्त केली. याप्रकरणी एकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पूर्णानंद मिश्रा (48) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पूर्णानंद मिश्रा हा नागपूरचा रहिवाशी आहे. तो सदर रक्कम चेन्नईला घेवून जात असताना आरपीएफने ही कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. ही रक्कम जप्त केली असून ही रक्कम कोणाची आहे? कुठे घेऊन जात होता? याची पुढील चौकशी आयकर विभाग करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)