66 हजार कोटींचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’

66 हजार कोटींच्या प्रकल्पांची शिफारस


पुणे आणि पिंपरी चिंचवड मनपा हद्दीबाहेर 10 किलोमीटर परिसराचा समावेश

पुणे – पुण्यातील सध्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा बनलेल्या वाहतूक प्रश्‍नावर मार्ग काढण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सुमारे सात हजार 200 चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाचा ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ (सीएमपी) तयार करण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार हे काम एल. अॅण्ड टी. कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीने पहिल्या टप्प्यातील अहवाल प्राधिकरणास सादर केला आहे. यामध्ये मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल आणि बीआरटी या मोठ्या प्रकल्पांसह प्रमुख चौकांचे रुंदीकरण असा सुमारे 66 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस प्राधिकरणाला केली आहे.

“सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्याचे काम पीएमआरडीएने “एल अॅण्ड टी’ या कंपनीला निविदा मागवून दिले होते. या कंपनीकडून त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये वरील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करताना रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ यांचा देखील अभिप्राय घेण्यात आला असून भविष्यातील त्यांची गरज लक्षात घेऊन, अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीएमआरडीएकडून सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे, पुणे महापालिकेने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प वाघोलीपर्यंत नेणे, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे याशिवाय सहा ते आठ नवीन मेट्रो मार्ग या अहवालात नव्याने सुचविण्यात आल्या आहेत. तर पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर येथील गर्दी कमी करण्यासाठी पर्याय म्हणून बायपास रेल्वेचा मार्ग नव्याने दर्शविण्यात आला आहे. या शिवाय दाटवस्तीच्या भागात मोनोरेल, काही भागात बीआरटीचे नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीपासून सुमारे 10 किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे.

या दोन्ही शहरांच्या लगत सर्वाधिक लोकसंख्या वाढीच्या वेग असलेल्या भागाचा विचार प्रथम या आराखड्यात करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अशा सुमारे 66 हजार कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

दोन हजार कि.मी.चा टप्पा
पीएमआरडीएच्या हद्दीतील वाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे काम एल.अॅण्ड टी. कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या दोन हजार चौरस किलोमीटर परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा तयार करून सादर केला आहे, अशी माहिती प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)