दिलीप गांधी यांच्यासह 64 जणांचे शस्त्रपरवाने रद्द ; जिल्हाधिकारी द्विवेदी यांचा दणका

नगर: लोकसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांतपणे पार पाडण्यासाठी तब्बल 64 जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज रद्दचा आदेश काढला. हे शस्त्र तत्काळ जमा करण्याचा आदेश केला आहे. शस्त्रअधिनियम 1959 चे कलम 17 (3) (ब) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ही कारवाई केली आहे. खासदार दिलीप गांधी, जिल्हापरिषदेचे माजी पदाधिकारी पदाधिकारी, माजी महापौर, जिल्हा बॅंकेचे संचालक व विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडे शस्त्र परवाने रद्दचा प्रस्ताव सादर झाला होता. पोलीस अधीक्षक यांच्याकडून हा प्रस्ताव दाखल करताना लोकसभा निवडणूक निर्भय, मुक्त, शांततेत पार पाडण्यासाठी या शस्त्र परवानाधारकांवर गुन्हे दाखल आहे. त्यांचे शस्त्रे परवाने रद्द करून, शस्त्रे जमा करून घेण्याबाबत म्हटले होते. पोलीस अधीक्षकांकडून 69 गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झाले होते. त्यापैकी 5 शस्त्र परवानधारकांचे शस्त्रपरवाने यापूर्वीच जिल्हादंडाधिकाऱ्यांनी रद्द केले. या प्रस्तावांवर विचार करून 64 शस्त्र परवानाधारक व्यक्तींचे शस्त्रपरवाने जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी रद्द केले आहे. हा आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक व संबंधित पोलीस निरीक्षकांना पाठविण्यात आला आहे. हे शस्त्र जमा करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

माजी महापौर फुलसौंदर यांच्यासह यांची झालीत शस्त्रपरवाने रद्द

नगर शहर व तालुका : खासदार दिलीप मनसुखलाल गांधी, अंबादास गारुडकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, सुनील डहाळे, अभिजित कोतकर, दीपक सिद्धवरम सुब्रमण्यम, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे, बापूसाहेब पालवे, रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी लॉरेन्स स्वामी, पोपट मोरे, जिल्हा परिषद सदस्य माधव लामखडे.
कर्जत ः बळीराम यादव, प्रसाद ढोकरीकर, सुरेश सांळुंके, अंबादास पिसाळ, लालासाहेब सुद्रीक, शांतीलाल कोपनर, मधुकर कोपनर, बाळासाहेब देशमुख, कैलास शेवाळे, पोपट गांगर्डे, प्रकाश भंडारी, पोपट अनभुले, गुलाब तनपुरे, मुबारक बादशाह मोगल, माणिकराव लोंढे, संभाजी भोसले, नितीन भोसले, शिवाजी पांडुळे, अविनाश दोषी.
पाथर्डी : राष्ट्रवादीचे नेते प्रताप बबनराव ढाकणे, दिनकर पालवे. नेवासे ः नानासाहेब तुवर, अशोक रामचंद्र गायकवाड, भाऊसाहेब मोटे. श्रीरामपूर ः शैलेश बाबरिया, श्‍यामलिंग शिंदे. संगमनेर ः भानुदास ढेरे. श्रीगोंदे ः श्‍यामराव नागवडे, लक्ष्मण बोरुडे, खंडू कोळपे, तुळशीराम रायकर. पारनेर ः राहुल शिंदे, तान्हाजी इकडे, दादाभाऊ थोरात, काशिनाथ राठोड, खोडा ठोंबरे, दौलत पांढरकर, गजानन औटी, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष सुजित वसंतराव झावरे, प्रभाकर रोहोकले, मधुकर उचाळे, संभाजी रोहोकले, शंकर नगरे. कोपरगाव ः अशोक रोहमारे, बाळासाहेब जगताप, नितीन औताडे, जयंत रोहमारे. राहाता ः नितीन कोते, नीलेश कोते. जामखेड ः दिलीप बाफना, हनिफ शेख, अंकुश ढवळे, किसन ढवळे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)