सायबर हल्ला प्रकरणी भारतीय वंशीयाला 63.64 कोटी रु.दंड 

वॉशिंग्टन  – अमेरिकेत सायबर हल्ला प्रकरणी एका भारतवंशीयाला 63.64 कोटी रु.दंड आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. न्यूजर्सीतील पंकज झा (22) नावाच्या युवकाने संगणक बनवाबनवी आणि दुरुपयोग कायद्याचा भंग केल्याची अमेरिकन जिल्हा न्यायाधीश मायकेल शिप यांच्यासमोर कबुली दिली आहे. हजारो संगणकांवर दुष्परिणाम करणाऱ्या क्‍लिकफ्रॉड बॉटनेट या हानिकारक सॉफ्टवेयरच्या निर्मितित पंकज झाचा सहभाग होता. त्यासाठी त्याला ही शिक्षा ठोठावलेली आहे.

गेल्या आठवडयात ट्रेन्टन फेडरल कोर्टातही पंकज झाला दोषी ठरवण्यात आले होते. सन 2014 आणि 2016 या काळात सादर करण्यात आलेले पुरावे आणि निवेदनांनुसार पंकज झा याने न्यू जर्सीच्या रूटर युनिव्हर्सिटीच्या नेटवर्कवर डीडीओएस (डिस्ट्रिब्यूशन डिनायल ऑफ सर्व्हिस) सायबर हल्ला केला होता. त्यासाठी त्याला पाच वर्षे तुरुंगवास आणि 2500 तास समाजसेवा करण्याची शिक्षा फर्मावण्यात आली होती

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)