छत्तीसगडमध्ये 62 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण 

रायपूर – छत्तीसगडमधील नारायणपूर येथे आज 62 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यामुळे सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. बस्तरचे विशेष पोलीस महानिरीक्षक विवेकानंद सिन्हा आणि नारायणपूरचे पोलीस अधिक्षक जितेंद्र शुक्‍ला यांच्यासमोर त्यांनी आत्मसमर्पण करण्यापूर्वी 51 देशी शस्त्रास्त्रे पोलिसांकडे सोपवले.

विवेकानंद सिन्हा यांनी सांगितले की, आत्मसमर्पण केलेले हे नक्षलवादी सीआयपी (माओवादी) गटांतर्गत कुतुल क्षेत्रात कार्यरत होते. नक्षलवाद्यांचा इतका मोठा गट आत्मसमर्पण निश्‍चितपणे सकारात्मक आहे. याचा माओवादी कार्यकर्त्यांवर मानसिक प्रभाव पडेल. तसेच आगामी दिवसांत आणखीन नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करण्याची अपेक्षा आहे, असे त्यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विधानसभा निवडणुकांच्या आधी पोलिसांना मिळालेले हे मोठे यश आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून नक्षलवाद्यांच्या हालचाली तीव्र झाल्या होत्या. छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी 30 ऑक्‍टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता. गेल्या महिन्यात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी येत्या दोन ते तीन वर्षांत देशातील नक्षलवाद संपुष्टात येईल, असे वक्तव्य केले होते. पूर्वी नक्षलवाद 126 जिल्ह्यात होता. तो आता 10-12 जिल्ह्यापुरता मर्यदित राहिल्याचे ते म्हणाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)