सोमालियात अमेरिकेच्या कारवाईत 62 इस्लामी कट्टरपंथी ठार

नैरोबी: सोमालियामध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईत अल-शबाब या इस्लामिक संघटनेचे 62 जण ठार झाले आहेत. शनिवारी चार हवाई हल्ल्यांत 32 तर रविवारी 2 हवाई हल्ल्यात 28 जण ठार झाले, असे अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे. कारवाईत कोणत्याही सामान्य नागरिकाने जीव गमावलेला नाही आणि हे हल्ले सोमालिया सरकारशी समन्वयातून ही कारवाई सुरू आहे, असे अमेरिकेच्या लष्कराने म्हटले आहे. या हल्ल्‌यासंदर्भात अल शबाबने कोणतीही वक्तव्य केलेले नाही.

अल कायदाशी संबंधित असलेल्या अल शबाब या दहशतवादी संघटनेने आता सैन्य तळांवर हल्ले न करता सरकारी कार्यालयांवर लक्ष्य करणे सुरू केले आहे. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अल शबाबच्या विरोधात 2017 पासून अमेरिकेची कारवाई सुरू आहे. त्यानंतर सोमालियात बरेच हल्ले झाले आहेत. 2017 पासून सुरू झालेल्या या हल्ल्यांत किमान 400 जण मारले गेले आहेत. ही संख्या मागील 10 वर्षांत मारले गेलेल्यांपेक्षा जास्त आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)