लोकसभेसाठी पालिकेचे सहा हजार कर्मचारी

पुणे – लोकसभा निवडणूक कामकाजासाठी महापालिकेचे तब्बल 6 हजार कर्मचारी कार्यरत असणार आहेत. यासाठी आवश्‍यक कर्मचाऱ्यांची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाने महापालिकेकडून मागविली होती. त्यानुसार जवळपास पाच ते सहा हजार कर्मचारी त्यासाठी उपलब्ध करून द्यावे लागणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

पुढील वर्षाच्या सुरूवातीलाच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मतदार नोंदणीपासून मतदान केंद्रापर्यंतची तयारी जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून सुरू आहे. या निवडणुकीसाठी मनुष्यबळ हा सर्वांत महत्त्वाचा भाग असतो. त्यानुसार आता निवडणूक विभागाने सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयाकडून निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नावे मागविली आहेत.

यामध्ये पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्याची संख्या सर्वाधिक असते. जवळपास 18 हजार कर्मचारी पालिकेकडे कार्यरत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, घनकचरा यासारख्या आवश्‍यक सेवा वगळून अन्य विभागाकडील कर्मचारी निवडणूक कामासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)