नवी दिल्ली – दिल्ली पोलिसांनी तब्बल 150 किलोंचे अमली पदार्थ जप्त केले असून आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 600 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यात अफगाणिस्तानमधील दोघा केमिकल तज्ज्ञांचा समावेश आहे. याचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
तर या कारवाई दरम्यान दिल्ली पोलिसांनी तीन लक्झरी कारही जप्त केल्या आहेत. 2 जुलैला वाघा बॉर्डरवर देखील 500 किलोग्रॅम हेरॉईन तसेच दोघांना अटक केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत 2700 कोटी असल्याचे सांगण्यात आले होते. हे हेरॉईन मीठाच्या पाकिटातून नेले जात होते.