अरूणाचलप्रदेशला निमलष्करी दलाच्या 60 कंपन्या हव्यात

इटानगर – अरूणाचल प्रदेशने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी केंद्र सरकारकडे निमलष्करी दलाच्या 60 कंपन्यांची मागणी केली आहे. राज्यातील 60 विधानसभा मतदार संघांतील 2202 मतदान केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी ही जादा सुरक्षा फौज गरजेची आहे असे त्यांनी केंद्र सरकारला कळवले आहे.

एकूण मतदान केंद्रांपैकी 662 केंद्रे संवेदनशील आणि 281 केंद्रे अतिसंवेदनशील आहेत. या राज्यात आधीच काही निमलष्करी दले तैनात आहेत त्यांना त्या खेरीज ही जादाची कुमक हवी आहे. संवेदनशील मतदान केंद्रांवर किमान सात सुरक्षा जवानांची नेमणुक करणे आवश्‍यक असून त्याखेरीच स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली जाते. या राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)