6.9 टक्के विकास दराचा चीनचा दावा

बिजींग – चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत चीनने 6.9 टक्के इतका विकास दर गाठला आहे अशी माहिती चीन सरकारच्यावतीने देण्यात आली आहे. विकास दरातील ही वाढ अपेक्षेपेक्षा अधिक आहे. तथापी असे असले तरी अर्थव्यवस्थेच्या विकासाला असलेला धोका अजून पुर्ण नाहीसा झालेला नाही असा इशारा तेथील आर्थिक विश्‍लेषकांनी दिला आहे.

सन 2017 वर्षाच्या पहिल्या सहा महिन्याचा आढावा घेतला तर सर्वसाधारणपणे देशाच्या आर्थिक विकासात चांगली सुधारणा आणि स्थिरता आली आहे असे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यातून संपुर्ण वर्षातील सरासरी कामगिरी चांगली राहील यासाठीचे फौंडेशन तयार झाले आहे. पण अर्थव्यवस्थेच्या विकासातील काही बाधक बाबी अजून पुर्णपणे टळलेल्या नाहीत असे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)