6 हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी इंडियन टेक्‍नोमॅकच्या संचालकास अटक

नहान (हिमाचल प्रदेश) – सुमारे 6 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सीआयडीने पाओन्ता साहिब येथील इंडियन टेक्‍नोमॅक कंपनीच्या संचालकास अटक केली आहे. विनय कुमार शर्मा असे या संचालकाचे नाव आहे. सिरमूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी एम.एल. शर्मा यांचा तो मुलगा आहे. शर्मा याला काल स्थानिक न्यायालयापुढे हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 24 मार्च पर्यंतची सीआयडी कोठडी सुनावली आहे.

एखाद्या राज्यामध्ये झालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे. हिमाचल प्रदेशच्या विविध विभागांच्यावतीने या घोटाळ्याचा तपास गेल्या चार वर्षांपासून सुरू आहे. इंडियन टेक्‍नोमॅक या कंपनीने मार्च 2014 पासून अचानक काम थांबवले आणि कंपनीचे अधिकारी पाओन्टा साहिब जिल्ह्यातल्या जगतापूर येथील गावातून कर्मचाऱ्यांचे पगार, वीज बिले, पीएफ, प्राप्तीकर, विक्री कर आणि अन्य सर्व देयके न देता अचानक गायब झाले होते. ही रक्कम कोट्यवधी रुपयांची होती. या प्रकरणी प्रमुख आरोपी आणि कंपनीचा व्यवस्थापकीय संचालक राकेश कुमार शर्माचा सीआयडी शोध घेत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)