6 लाख 18 हजार बालकांना रुबेला लस

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण 6 लाख 18 हजार बालकांना रुबेला व मिझेल्स लस दिली जाणार आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून पुढील पाच आठवडे ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या वैद्यकीय विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल के. रॉय, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज जाधव आदी उपस्थित होते.

शहराच्या सुमारे 22 लाख लोकसंख्येचा विचार करता, त्यामध्ये 9 महिने ते 15 वर्षे या वयोगटातील सुमारे 6 लाख 18 हजार बालके आहेत. या सर्व बालकांना ही लस दिल जाणार आहे. यामध्ये अंगणवाड्या, बालवाड्या, महापालिका शाळा, खासगी शाळा व अपंग विद्यालयांमधील विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. शहरात एकूण 11 अपंग विद्यालये असून, यामधील विद्यार्थ्यांना प्राधान्याने ही लस उपलब्ध करुन देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. या लसीकरणाबाबत पालकांच्या मनातील अकरा भीती दूर करण्यासाठी जाहिरात केली जाणार आहे. याकरिता पोस्टर्स, एसएमएस, जिंगल्स, बॅनर्सच्या माध्यमातून संवाद साधला जाणार आहे.

-Ads-

अंगणवाडी सेविकांना देणार प्रशिक्षण
मानसिक दृष्ट्या अपंग असलेल्या बालकांचे अपंगत्व तत्काळ समजावे, याकरिता शहरातील बालवाड्या व अंगणवाडी शिक्षिकांना हे अपंगत्व ओळखण्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाणार आहे. याकरिता पुढील आठवड्यात महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएमएच) हे प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे.

सरकारी पातळीवरील लसीकरणाबाबत पालकांच्या मनात अकारण भीती व गैरसमज असण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशा पालकांकडून आपल्या पाल्यांना ही लस देण्यास विरोध होऊ शकतो. या पालकांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्या नऊ महिने ते 15 वर्षे दरम्यानच्या पाल्यांना लस देऊन, या पालकांमध्ये विश्‍वास निर्माण केला जाणार आहे. त्याकरिता सर्वच पालकांनी सहकार्य करावे.
– संतोष पाटील, अतिरिक्‍त आयुक्‍त, महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)