वर्षभरात पाकमधील दहशतवादी हल्ल्यांत 595 ठार

इस्लामाबाद: गेल्या वर्षभरात पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये 595 लोक मारले गेले आहेत. मारले गेलेल्यांत सुरक्षाकर्मींचाही समावेश आहे. या दहशतवादी हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांची संख्या 1030 आहे. मागील वर्षी पाकिस्तानमध्ये एकूण 262 दहशतवादी हल्ले झाले आहेत. पीआयपीएस (पाक इन्स्टिट्यूट फॉर पीस स्टडीजने ही आकडेवारी जाहीर केली आहे. झालेल्या एकूण 262 दहशतवादी हल्ल्यांपैकी सर्वाधिक 136 हल्ले सुरक्षाकर्मींवर झालेले आहेत. त्या खालोखाल विविध पक्ष आणि त्यांचे नेते यांच्यावर 24 दहशतवादी हल्ले झाले आहेत.

गेल्या वर्षी दहशतवाद्यांचा सामना करण्यात पाकिस्तानी सुरक्षा दले फारच कमी पडल्याचे दिसून आले आहे. सन 2017 मध्ये सुरक्षाकर्मींनी 524 दहशतवादी ठार केले होते, त्या तुलनेत सन 2018 मध्ये सुरक्षादलांना फक्त 120 दहशतवाद्यांनाचा खातमा करण्यात यश मिळाले आहे. सन 2017 प्रमाणेच सन 2018 मध्येही बलुचिस्तान आणि खैबर पख्तुन्वा प्रांतात दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बलुचिस्तानमध्ये सन 2017 च्या तुलनेत सन 2018 मध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 23 टक्के वाढ झालेली आहे. 2018 मध्ये तहरिक ए तालिबान पाकिस्तान आणि त्याच्या सहकारी दहशतवादी गटांनी 171 हल्ले केले. सीमेबाहेरून झालेल्या 131 हल्ल्यांमध्ये 120 दहशतवादी ठार झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)