अंगणवाड्यांसाठी 59 लाखांचा निधी – बुट्टे पाटील

शिंदे वासुली – पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटामधील 7 अंगणवाडी इमारती बांधकामासाठी प्रत्येकी 8. 50 लाख याप्रमाणे 59. 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला, असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी दिली.

शरद बुट्टे पाटील म्हणाले की, या जिल्हा परिषद गटात एकूण 62 अंगणवाडी केंद्र असून मागील 3 वर्षांपासून अंगणवाडीसाठी काम करत असताना 19 नवीन सुसज्ज इमारती बांधकामासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. नुकतेच पिंपरी बुद्रुक गावठाण, लादवड, करंजविहीरे गावठाण, चांदूस-गणेशनगर, शिंदे-ठाकरवाडी, पाईट -चिखलवाडी व तळवडे गावठाण या सात ठिकाणी अंगणवाड्यांच्या नवीन इमारतींसाठी निधी मंजूर केला आहे. गटामध्ये 62 अंगणवाड्यांपैकी 58 ठिकाणी इमारतींना निधी दिला असून केवळ 4 गावांमध्ये जागेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने निधी मंजूर करता येत नाही. संबंधित ग्रामपंचायतींनी जागा उपलब्ध करून दिल्यास गटातील अंगणवाडी इमारतींचे 100 टक्‍के काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. निधी मंजूर झालेल्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी व कर्मचाऱ्यांनी ई- निविदा करुन घेणे व त्या संबंधी आवश्‍यक ती कामे काळजीपूर्वक व वेळेत करून इमारतीचे बांधकाम दर्जेदार होण्यासाठी लक्ष देण्याचे आवाहन बुट्टे पाटलांनी केले आहे.

सावंतवाडी शाळेसाठी 3 लाख
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाने सावंतवाडी शाळेच्या वर्ग खोल्यांचे पत्रे उडून मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटाचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी त्वरीत दखल घेऊन वर्ग खोल्यांची दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेतून 3 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच शाळेच्या वर्गखोलीची पाहणी करून तातडीने दुरुस्तीसाठी बुट्टे पाटलांनी 3 लाख रूपये मंजुर केले आहेत. तसेच कोहिंडे बुद्रुक, रौंधळवाडी येथील वादळाने शौचालयाची झालेली पडझड व इतर दुरूस्तीसाठीही 3 लाख रुपये जिल्हा परिषद निधीतून मंजुर केला व सावंतवाडी येथील अंगणवाङी इमारत बांधकामाची पाहणी करून काही सूचना केल्याची शरद बुट्टे पाटलांनी माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)