59 मिनीटात मिळणार 1 कोटी रुपयांचे कर्ज ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा 

नवी दिल्ली: छोटया आणि मध्यम स्वरुपांच्या व्यवसायासाठी 59 मिनिटात 1 कोटी रुपयापर्यंत कर्ज मंजूर करण्याची महत्वपूर्ण घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली. पंतप्रधान मोदींनी एमएसएमई सपोर्ट कार्यक्रम लॉंच केला.त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी आपल्या सरकारने धोरणांना मंजुरी दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. हे दिवाळी गिफ्ट असून यामुळे सूक्ष्म, छोटया आणि मध्यम स्वरुपाच्या व्यवसायांना सहज कर्ज उपलब्ध होईल आणि रोजगार वाढेल असे मोदी म्हणाले.
छोटया उद्योगांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतले असून जीएसटी नोंदणीकृत एमएसएमई उद्योगांना कर्जामध्ये 2 टक्के सवलत मिळेल. एमएसएमई सेक्‍टरमुळे भारत आर्थिक दृष्टया बळकट झाला आहे असे मोदी म्हणाले.
देशातील 100 जिल्ह्यात पुढचे 100 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे असे मोदी म्हणाले. देशाच्या जीडीपीमध्ये एमएसएमई सेक्‍टरचे 30 टक्के योगदान आहे. या सेक्‍टरचे देशभरात विशाल जाळे पसरले असून 6.3 कोटीपेक्षा जास्त एमएसएमई युनिट देशात कार्यरत असून 11 .1 कोटी लोकांना यातून रोजगार मिळतो असे मोदींनी सांगितले

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)