59 उमेदवारांचे नाव “ब्लॅक लिस्ट’

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणाऱ्या विविध परीक्षेत गैरप्रकार अथवा चुकीची माहिती सादर केलेल्या 59 उमेदवारांचे नाव आयोगाने ब्लॅक लिस्टमध्ये टाकले आहे. यातील बहुतांश उमेदवारांना यापुढे परीक्षेला बसता येणार नाही, अशी यादीच आयोगाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आयोगाच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना चांगलाच धडा मिळाला आहे.

आयोगाने उमेदवारांचे नाव, कोणती परीक्षा आणि किती वर्षांसाठी परीक्षेस बंदी, याचीच यादी जाहीर केली आहे. यात 59 उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज भरताना चुकीची माहिती, गैरप्रकार अथवा परीक्षेच्या कालावधीत नियमाचे उल्लंघन या कारणामुळे या उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील काही उमेदवारांना तीन वर्षे, पाच वर्षे आणि कायमस्वरुपी परीक्षेस बसता येणार नाही, असे आयोगाने यादीत स्पष्ट केले आहे. अर्ज भरल्यानंतर प्रत्यक्षात कागदपत्राची पडताळणीवेळी त्यात कागदपत्रे बोगस असतील, अशा उमेदवारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत आयोगाच्या परीक्षेला बसता येणार नाही.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)