58 आमदार खासदारांविरोधात आक्षेपार्ह भाषणाची प्रकरणे

नवी दिल्ली – देशातील एकूण 58 विद्यमान आमदार आणि खासदारांविरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्याची प्रकरणे सुरू आहेत. यामध्ये भाजपच्या आमदार खासदारांची संख्या सर्वात जास्त आहे. दिल्लीतील “असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने केलेल्या एका अहवालामध्ये ही बाब नमूद करण्यात आली आहे. या आमदार आणि खासदारांनी निवडणूकीपूर्वी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे.

राज्यसभेमधील कोणाही खासदाराविरोधात असे प्रकरण नाही, असे या अहवालात म्हटले आहे. तर लोकसभेतील 15 खासदारांनी त्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्‍तव्य असल्याची माहिती दिली आहे. या 15 जणांपैकी 10जण भाजपचे विद्यमान खासदार आहेत. तर “ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’, तेलंगण राष्ट्र समिती, “पट्टाली मक्कल काची’, “एआयएमआयएम’ आणि शिवसेनेच्या प्रत्य्की एका सदयाविरोधात द्वेषमूलक भाषणाचे प्रकरण आहे.

अशा स्वरुपाचे प्रकरण दाखल असलेले भाजपाकडे 27 आमदार, खासदार आहेत. तर “एमआयएम’पक्षाच्या 6, टीआरएसच्या 6, टीडीपी आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 3, एआयटीसीच्या 2, कॉंग्रेस, अपक्ष, संयुक्‍त जनता दलाचे प्रत्येकी 2, युडीएफ, बसपा, द्रमुक, पीएमके आणि समाजवादी पार्टीच्या एका विद्यमान आमदार, खासदाराविरोधात द्वेषमूलक भाषणाचे प्रकरण दाखल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)